Pune Divorce News : पोपट परत दिला अन् घटस्फोटाचा मार्ग झाला मोकळा, पुण्यात रंगली जोरदार चर्चा, नेमकं घडलं काय?

Pune Divorce News : पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात एका घटस्फोटाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे . हा घटस्फोट चक्क पोपटामुळे रखडला होता. घटस्फोट घेताना पतीने पत्नीला भेट म्हणून दिलेला आफ्रिकन पोपट परत देण्याची अट घातली होती.
पती-पत्नी वेळगे झाले असेल तरी पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात या दोघांच्या घटस्फोटाची सध्या चर्चा होताना दिसत आहे. पतीची ही अट मान्य करत पत्नीने आफ्रिकन पोपट परत केला आणि घटस्फोटाचा मार्ग मोकळा झाला. २०१९ मध्ये पुण्यात घटस्फोट घेतलेल्या जोडप्याचा विवाह झाला होता.
मात्र, गेल्या चार ते पाच वर्षांपासून या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. सततच्या भांडणांमुळे वैतागलेल्या पती-पत्नीनं अखेर एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला.
घटस्फोटाच्या प्रकरणात पती आणि पत्नी या दोघांनीही पोटगी, स्त्रीधन, स्थावर, जंगम मालमत्तेवरील हक्क सोडले. मात्र, पत्नीला घटस्फोट देण्यासाठी पतीने एक अट घातली. पत्नीला पहिल्या भेटीत भेट म्हणून दिलेला आफ्रिकन पोपट तिने मला परत दिला तरच मी तिला घटस्फोट देईल, अशी अट त्याने घातली. Pune Divorce News
परंतु दोघांचाही जीव पोपटात अडकला होता.पत्नीने मिळणारा पोटगीचा हक्क सोडून देत दिवाणी अथवा फौजदारी दावा दाखल न करण्याचे मान्य केले. मात्र पती आपल्या मागणीवर ठाम राहीला. त्यामुळे पतीच्या मागणीसमोर पत्नीने हात टेकले आणि अखेर पोपट देण्यास संमती दिली.
विवाह समुपदेशक असलेल्या शशांक मराठे यांनी १६ नोव्हेंबर २०२३ पूर्वी पोपट पतीकडे सुपूर्त करण्यात यावा, असं नमूद करत संबंधित अहवाल कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. कदम यांच्याकडे पाठवला. घटस्फोटाच्या अर्जास सहा महिने पूर्ण झाले होते.
दोघेही एका वर्षापेक्षा जास्त काळ विभक्त राहत असल्याने न्यायालयानेही त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केला. मात्र या अनोख्या घटस्फोटाची चर्चा जोरदार सुरु आहे. Pune Divorce News