Pune Crime : पुण्यात संतापजनक घटना! अंडी चोरल्याच्या संशयावरून महिलेचा विनयभंग, कपडे काढण्यास सांगितले अन्…


Pune Crime :  पुणे : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

हॉटेलमधील अंडी चोरल्याच्या संशयातून एका ५० वर्षीय महिला जबरदस्तीने कपडे उतरवण्यास भाग पाडले इतकेच नाही, तर तिचा विनयभंग देखील करण्यात आला. हा संतापजनक प्रकार पुण्यातील येरवडा परिसरात रविवारी (ता.१७) दुपारच्या सुमारास घडला.

याप्रकरणी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, मुकेश सिंह पुंन्डील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पीडित महिला पुण्यातील येरवडा परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करते. आरोपी मुकेश देखील याच हॉटेलमध्ये कुक म्हणून कामाला आहे. रविवारी दुपारच्या सुमारास पीडित महिला हॉटेलमधील किचनमध्ये काम करीत असताना आरोपी मुकेश हा तिथे आला. Pune Crime

तू अंडी कुठे लपवून ठेवले असं म्हणत त्याने पीडितेवर अंडी चोरल्याचा आरोप लावला. इतकंच नाही, तर आरोपीने महिलेच्या अंगाची झडती घेत तिला कपडे उतरवण्यास भाग पाडले.

दरम्यान, आरोपीचे कृत्य इथेच थांबले नाही, तर या प्रकारानंतर जेव्हा महिला घरी निघाली, तेव्हा त्याने तिचा रस्ता अडवला. त्याचबरोबर विनयभंग करीत शेरेबाजी देखील केली.

या संपूर्ण प्रकारानंतर पीडित महिलेने येरवडा पोलिसांत धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी मुकेश सिंह पुंन्डील याच्यावर विनभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!