Pune Crime : दारु पिण्याच्या पैशावरून झाला वाद, दाजीचा दगडाने ठेचून खून, पुण्यात भयंकर घटना….
Pune Crime : शिक्षणाचे माहेरघर म्हणल्या जाणाऱ्या पुण्यात दिवसेंदिवस फारच विचित्र घटना घडत आहेत. पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीला धक्का देणाऱ्या अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून घडत आहेत.
कधी रस्त्यावर गोळीबार, अपघातांचे वाढते प्रमाण तर कधी भरदिवसा केलेली हत्या यामुळे पुण्यात सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दारु पिण्याच्या पैशांवरुन झालेल्या भांडणात तरुणाने आपल्याच दाजीचा दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.
अभिनंद निरेसा दाहा (वय २९, रा. सोम प्रोजेक्ट आयटीआय कॉलेज कामगार वसाहत, नाणोली, ता. मावळ) असे खून झालेल्या बिहारी कामगाराचे नाव आहे.
याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी प्रोमोद कुमार जगनसादा (वय २२, रा. सोम प्रोजेक्ट, आयटीआय कॉलेज कामगार वसाहत, नाणोली, ता. मावळ) याला अटक केली आहे. याबाबत पोलीस अंमलदार केशव घोटकर यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनंदन हा प्रोमोद याचा दाजी आहे. हे दोघेही कामाच्या निमित्ताने मागील काही महिन्यांपासून नाणोली येथील सोम प्रोजेक्ट येथील कामगार वसाहतीत रहात होते. अभिनंद निरेसा दाहा हा नेहमी दारु पिऊन आई बहिणीवरुन शिवीगाळ करीत असे. तसेच भांडण करुन मारहाण करीत होता. Pune Crime
प्रोमोद व अभिनंद हे एकत्र जेवण करत असताना दारु पिण्याच्या पैशांवरुन त्यांच्यात भांडणे झाली. त्यात प्रोमोद याने मोठा दगड अभिनंद याच्या डोक्यात व चेहर्यावर मारुन त्याचा खून केला.
सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पिंपरी चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाला ११२ वरुन फोनवरुन नागरिकाने याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस नाणोलीतील कामगार वसाहतीत गेले असता अभिनंद याचा खून झाल्याचा प्रकार समोर आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव तपास करीत आहेत.