Pune Crime : पुण्यात ७० वर्षीय वृद्धाचा कारनामा, कामाच्या ठिकाणी महिलेला जवळ ओढून केले ‘हे’ कृत्य, घटनेने उडाली खळबळ..


Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुण्यात एका ७० वर्षाच्या नागरिकाकडून महिलेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कामाच्या ठिकाणी सहकारी महिला नकार देत असतानाही तिला जबरदस्तीने जवळ घेत चुंबन घेतल्याची घटना घडली आहे. Pune Crime

राजीव विनायक विळेकर असे या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पुण्यातील घोले रस्त्यावरील महात्मा फुले वस्तू संग्रहालयातील सहकारी महिलेचा या वृद्ध व्यक्तीकडून विनयभंग करण्यात आला. ऑफिसमध्ये काम करत असतानाच सहकारी महिलेकडे ७० वर्षीय व्यक्तीने चुंबनाची मागणी केली. त्यानंतर ही महिला नकार देत असताना आरोपीने महिलेला जबरदस्तीने जवळ घेत चुंबन घेतले .

या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेतवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. राज्यातील महिलांच्या सुरक्षेबाबत अनेक नकारात्मक बाबी येत पुण्यातील या घटनेमुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!