Pune Crime : घरात वाद झाला, रागात पत्नीच बोटच कापलं, दारूच्या नशेत पुण्यात भयंकर घटना….

Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.
सध्या अशीच एक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. दारूच्या नशेत एका व्यक्तीने पत्नीचे बोट कापले. कुटुंबीयांनी महिलेला तातडीने रुग्णालयात नेले, तेथे तिच्यावर उपचार करण्यात आले. पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पतीला गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
सूरज पासवान याला दारू पिण्याचे व्यसन आहे. त्यांची पत्नी संजू पासवान एका खासगी कंपनीत मजूर म्हणून काम करते. शनिवारी सूरज पासवान यांचे मुलासोबत काही कारणावरून भांडण झाले होते.
हे पाहून सूरजची ३५ वर्षीय पत्नी संजू पासवान मध्यस्थी करण्यासाठी गेली. हे पाहून सूरजला राग आला. यानंतर सूरज पासवान याने पत्नी संजू पासवानच्या उजव्या हाताचे एक बोट कापले. यामुळे ती जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. आता तिची प्रकृती ठीक आहे. मात्र या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती. Pune Crime
यानंतर पीडित महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी सूरज पासवानला अटक केली. आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भीमा नरके यांनी अटकेला दुजोरा दिला आहे.