Pune Crime : तरुणीकडे पाहून रिक्षाचालकाचे धक्कादायक कृत्य, कोरेगाव पार्क परिसरातील घटना…


Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

एका रिक्षाचालकाने तरुणीकडे पाहून अश्लील हातवारे करुन विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे हा प्रकार रविवारी (ता.२४) रात्री सात ते आठच्या दरम्यान हॉटेल माउटंनगोट, लेन नं. ६ येथे घडला आहे.

याबाबत चंदननगर येथे राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीने गुरुवारी (ता.२८) कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे. Pune Crime

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या लेन नं.६ येथील हॉटेल माउटंनगोट येथे गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी रिक्षाचालकाने त्यांच्याकडे पाहून अश्लील हातवारे करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!