Pune Crime : नराधम बापाकडून साडेचार वर्षाच्या चिमुकलीचे लैगिक शोषण, पुण्यात धक्कादायक प्रकार…
Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.
जन्मदात्या बापानेच साडेचार वर्षाच्या मुलीशी गैरवर्तनुक करुन तीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकणी पीडित मुलीच्या ३४ वर्षीय आईने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार आरोपी बापावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी व आरोपी पती पत्नी असून त्यांना साडेचार वर्षाची मुलगी आहे.आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना तिच्यासोबत गैरवर्तन करुन तिच्या स्त्री मनास भिती व लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. आरोपीने मुलीचे लैंगिक शोषण केले. Pune Crime
पीडित मुलीने तिच्या आईला याबाबत सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीच्या आईला हा प्रकार समजल्यानंतर तिने चंदननगर पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरोधात फिर्य़ाद दिली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुळुक करीत आहेत.