Pune Crime : पुणे पोलिसांनी गुन्हेगारांना घडवली अद्दल, ज्या ठिकाणी गुन्हा केला त्याच ठिकाणी नेऊन…

Pune Crime पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असे म्हटले तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढेच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.
गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी आता वेगळी युक्ती शोधून काढली आहे. गुन्हा केलेल्या ठिकाणीच पोलिसांनी गुन्हेगारांना चांगलीच अद्दल घडवली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील हडपसर या भागात कारची तोडफोड करत एका टोळक्यानं चांगलीच दहशत निर्माण केली होती. Pune Crime
यावर आता पुणे पोलिसांनी या टोळक्याला चांगलीच अद्दल घडवली आहे. ज्या परिसरात गाड्यांची तोडफोड केली त्याच परिसरात पोलिसांनी आरोपींची धिंड काढली आहे. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी हडपसर भागात सात ते आठ गाड्यांची आणि परिसरातील दुकानांची तोडफोड केली होती. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
यावर आता पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे आता कौतुक होत आहे.