Pune Crime : पुणे विमानतळावर महिला प्रवाशाचं संतापजनक कृत्य, महिला जवानाला धक्काबुक्की, हातालाही चावली…

Pune Crime : पुणे विमानतळावर महिला प्रवाशाने महिला जवानाला मारहाण करून तिच्या हाताचा चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे-दिल्ली विमानप्रवास आसनावरून दोन प्रवाशांत वाद झाला.
पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानात हा प्रकार घडला. याप्रकरणी संबंधित महिलेविरोधात पुण्याच्या विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुरेखा सिंह (वय, ४४) असे आरोपी महिलेचे नाव असून ती पुण्यातील वाकड येथील संतोष नगरमधील रहिवासी आहे. तिच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, सुरेखा सिंह आपल्या पतीसोबत शनिवारी पुण्याहून दिल्लीला जात होती. सुरेखा सिंहने बुकींग केलेल्या सीटवर अवंतिका बोरसे आणि आदित्य बोरसे हे प्रवासी बसले. यावरून सुरेखा सिंह यांनी त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्याने दोन्ही प्रवाशांमध्ये हाणामारीला सुरुवात झाली.
याबाबत माहिती मिळताच सीआयएसएफ जवान प्रियांका रेड्डी घटनास्थळी पोहोचल्या. यानंतर प्रियांका रेड्डी यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुरेखा सिंहने प्रियंका यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढेच नाहीतर, सुरेखा सिंहने प्रियंका यांच्या हाताला घेतला. Pune Crime
या घटनेत प्रियंका रेड्डी जखमी झाल्या. या प्रकरणी महिला जवानाने आरोपी महिलेविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर विमानतळ पोलिस ठाण्यात सुरेखा सिंगविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विमानामध्ये झालेल्या या राड्यामुळे प्रवासी आणि केबिन क्रूमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.