Pune Crime News : पुण्यात धक्कादायक प्रकार! स्कूल व्हॅनवरच मुलांकडून कोयत्याने हल्ला, उडाली खळबळ…


Pune Crime News : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

पुण्यात एका धक्कादायक घटनेत, दोन अल्पवयीन मुलांनी कोयत्याने स्कूल व्हॅनच्या समोरील विंडशील्डची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील वाघोली येथील बकोरी रोडवर सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

या हल्ल्यात स्कूल व्हॅनचा चालक जखमी झाला. या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे म्हटलं जात असून याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सचिन दिगंबर इंगोले (वय. २७, रा. काळूबाई नगर, वाघोली) असे हल्याचा प्रयत्न झालेल्या व्हॅन चालकाचे नाव आहे. या प्रकरणी त्याने फिर्याद दिली असून हल्ला करणाऱ्या अल्पवयीन तरुणासह आकाश तोरंभे (रा. वाघोली) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन कदम हा व्हॅन मालक आहे. त्याच्याकडे इंगोले हा चालक म्हणून काम करतो. इंगवले हा काही विद्यार्थिनींना त्यांच्या राहत्या घरी सोडण्यासाठी जात असताना दोन अल्पवयीन तरुणांनी त्यांची व्हॅन अडवून इंगवले यांच्यावर हल्ला केला.

त्यानंतर दोघांनीही कोयत्याने व्हॅनच्या खिडकीची तोडफोड केली आणि इंगवले यांना जीवे मारण्याची धमकी दिली. लोणीकंद पोलिसांनी याप्रकरणी दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

हल्ला करणाऱ्यांपैकी एकाचे इंगवलेंसोबत जुना वाद होता. त्यामुळे पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे तपासात समोर आले आहे. अटकेत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या बहिणीने केलेल्या छळाच्या तक्रारीनंतर इंगवले एका संशयितासोबत कोर्टात गेले होते. इंगवले त्या संशयितासोबत गेल्याने नाराज झालेल्या अल्पवयीन मुलाने त्याच्या साथीदारासह हल्ला करण्याचे ठरवले होते.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी वाघोली परिसरात एका स्कूलच्या बसचा अपघात झाला होता. यामध्ये काही विद्यार्थी जखमी झाले होते. हा अपघात भयंकर होता. यानंतर सोमवारी हल्याचा गंभीर प्रकार घडला. असा प्रकाराने मुले भेदरत असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने पालक चिंतेत पडले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!