Pune Crime News : पुणे विमानतळावर सोन्याची मोठी तस्करी, महिलेसह दोघांना अटक, तब्बल ६ किलोचं सोनं जप्त..

Pune Crime News : पुणे विमानतळ सोने तस्करीचा अड्डा बनत असल्याचे मागील काही दिवसांत झालेल्या कारावाईतून समोर आलं आहे. त्यातच आता पुन्हा एकदा पुण्यात दुबईहून सोन्याची तस्करी होत असल्याचं समोर आले आहे.

या प्रकरणी महसूल गुप्तचर संचलनालयाने (डीआरआय) यांनी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ६ किलो ९१२ ग्रॅम सोने जप्त केलं आहे. यावेळी सोन्याची तस्करी करणाऱ्या महिलेसह दोघांना पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली आहे.
दुबईहून सोन्याची तस्करी करून एक महिला पुणे विमानतळावर येणार असल्याची माहिती डीआरआय मिळाली होती. त्यानुसार पथकाने विमानतळावर सापळा लावला होता. दोघांची तपासणी केली असता त्यांच्याकडे सोने आढळून आले.

विमानतळावर आल्यानंतर एक महिला पोलिसांना अतिशय गडबडीत दिसली. ती महिला आणि तिचा साथीदार खूप घाईने विमानतळाच्या बाहेर पडण्याच्या तयारीत होती. डीआरआयच्या पथकाने या दोघांची संशयावरून चौकशी सुरू केली. त्या दोघांची तपासणी केली, तेव्हा त्यांच्याकडे हे सोनं आढळून आलं. Pune Crime News

त्यानुसार महिलेसह तिच्याबरोबर असलेल्या अटक करण्यात आली. आरोपींनी या सोन्याची पावडर केली होती. सहा किलो ९१२ ग्रॅम वजन असलेल्या सोन्याची पावडर केली होती. ती पावडर त्यांनी पट्टा आणि पाकिटात लपवून ठेवली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोने जप्त झाल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे.