Pune Crime News : मित्रांकडूनच कॉलेज तरुणीवर अत्याचार, केक कापण्याचा बहाना करून नदीपात्रात नेलं अन्…; घटनेने पुणे हादरलं

Pune Crime News पुणे : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
एका अल्पवयीन कॉलेज तरुणीवर दोन तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. . मांजरी परिसरातील नदीपात्रात हा प्रकार घडला. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अनुराग आणि गणेश अशी अत्याचार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी तरुण हे पीडित तरुणीचे मित्र होते. Pune Crime News
मिळालेल्या माहिती नुसार, वाढदिवसाचा केक कापण्याचा बहाणा करून आरोपींनी दुचाकीवरून तरुणीला मांजरी येथील निर्जनस्थळी नेलं. रात्री परिसरात कुणी नसल्याची संधी साधत आरोपींनी पीडितेवर सामूहिक अत्याचार केला.
अत्याचारानंतर आरोपींनी पीडितेला नदीपात्रातच सोडून दिलं. याबाबत कुणालाही सांगितल्यास तुला जीवे मारू, अशी धमकी देखील पीडितेला दिली. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून हडपसर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.