Pune Crime News : सणासुदीला आईवडील गावी गेले, मुलगा रात्री एक वाजता घराबाहेर पडला अन् सगळं संपलं, कुटूंबावर शोककळा..


Pune Crime News  पुणे : पुण्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. खंबाटकी बोगद्यानंतरच्या वळणावरील नाल्यात बावधन (पुणे) येथील युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. छिन्नविछिन्न अवस्थेत हा मृतदेह सापडला आहे. Pune Crime News

ध्रुव स्वप्नील सोनावणे १८ वर्षीय मुलाचे नाव आहे. रविवारपासून कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. मात्र त्याचा आता मृतदेह सापडला आहे. त्यामुळे नेमके काय घडले असावे, याचा अंदाज लावला जात आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, खंबाटकी बोगद्यानंतरच्या पहिल्याच वळणावर ध्रुव सोनावणे हा टू व्हिलर घेऊन नाल्यात पडला होता. मात्र याच परिसरात मोठी झाडी आहे आणि गवतही आहे. त्यामुळे तो पडला आहे हे कोणाच्याही लक्षात आलं नाही.

मात्र रस्त्याजवळची झुडपे काढताना त्याची गाडी दिसली. या गाडीचा शोध घेतला असता. ध्रुवचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी अपघात होऊन ध्रुव याचा मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी त्याच्या कुटुंबीयांना विचारले असता. ध्रुवचे आई-वडिल आणि त्याची आजी हे सणसुदीसाठी अमळनेर (जळगाव) हे मूळ गावी गेले होते. ध्रुव त्याच्या बावधनच्या घरी एकटाच होता. घरी एकटाच असल्याने त्यांच्या आत्याने विचारपूस केली होती.

त्यावेळी त्यांच्या आत्याला तो घरी नसल्याचे समजले. त्यानंतर आत्याने सीसीटीव्ही चेक केले असता. तो रात्री एकच्या दरम्यान घरातून बाहेर गेल्याचे दिसून आलं. त्यानंतर ध्रुव बेपत्ता झाल्याची तक्रार हिंजवडी पोलिसांकडे दिली होती.

त्यानुसार पोलिसांनी चौकशी सुरु होती. मोबाईलचं लोकेशन पाहण्याचा किंवा शोधण्याचा प्रयत्न केला. रविवारी दिवसभर पारगाव खंडाळा होतं. त्यानंतर त्याचे वाई परिसरात दिसत होते.

मात्र रविवारपासून त्याचे लोकेशन पोलिसांना सापडत नव्हतते. धृव आणि त्याच्या कुटुंबियांनी पाच दिवस त्याचा कसून शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. शेवट खंडाळ्याजवळ तो आणि त्याची टू व्हिलर सापडली. त्याच्या अचानक जाण्याने सोनावणे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!