Pune Crime News : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल..


Pune Crime News : सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार ४ जानेवारी रोजी लोहगाव येथे घडला आहे. व्यवसायासाठी माहेरहून पैसे घेऊन यावे यासाठी आणि चारित्र्याच्या संशयातून सासरचे लोक विवाहितेचा छळ करत असल्याची माहिती आहे.

गौरी राजेंद्र खंडागळे (वय ३५, रा. आंबोलीता, ता. खेड) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी पती राजेंद्र बारकू खंडागळे, सासू कुसूम बारकू खंडागळे, दीर नितीन खंडागळे, रेखा नितीन खंडागळे, शोभा शिंदे (सर्व रा. आंबोलीता, ता. खेड, पुणे) यांच्यावर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकणी गौरी हिचे वडील विठ्ठल पवार (वय. ६५, रा. केळडे, ता. भोर) यांनी बुधवारी (ता. १७) फिर्याद दिली. Pune Crime News

मिळालेल्या माहिती नुसार, गौरी खंडागळे आणि राजेंद्र खंडागळे यांचे २०१३ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर पाच वर्षांनी आरोपींनी संगनमत करून गौरीचा छळ करण्यास सुरुवात केली. व्यवसायासाठी तुझ्या आई-वडिलांकडून पैसे घेऊन ये, अशी मागणी आरोपींनी केली.

तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण केली. आरोपींच्या त्रासाला कंटाळून गौरी हिने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वारंगुळे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!