Pune Crime : जुन्या भांडणाचा राग, डोक्यात वीट मारुन मजुराचा खून, सिंहगड रस्ता परिसरातील धक्कादायक घटना…

Pune Crime पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.
जुन्या भांडणातून बांधकाम मजुराच्या डोक्यात सिफोरेक्स ब्रिक्स ही वीट मारुन खून केल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली आहे. ही घटना नांदेड सिटीच्या अलिकडे सुरु असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी मंगळवारी (ता.१२) दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे.
पिंटु गौतम दास (वय.२८ सध्या रा. बांधकामाच्या ठिकाणी, मूळ -हिल्ली जि. दक्षिण दिनाजपुर, पश्चिम बंगाल ) असे खून झालेल्याचे नाव आहे. पिंटू याचा भाऊ छोटु गौतम दास (वय.२३ धंदा-मजुरी, सध्या रा. वानवडी) याने याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्यातफिर्याद दिली आहे. यावरून एजाज उल महंमद हसिब आलम (मूळगाव बिहार) याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, मयत व आरोपी हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. त्या दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन रविवारी वाद झाले होते.याच रागातून आरोपीने चंद्रकांत देडगे यांच्या बिल्डींग बांधकामावरील कामावर असताना ५ व्या मजल्यावर पिंटू याच्या डोक्यात वीटांनी घाव घातले. Pune Crime
यात पिंटू हा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.