Pune Crime : नोकरी आमिष, नंतर तरुणीला गुंगीचे औषध देऊन केला बलात्कार, गर्भपात अन्….!! घटनेने सगळेच हादरले

Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पुण्यात बोलावून नाश्त्यामध्ये गुंगीचे औषध देऊन जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर वारंवार धमकी देऊन बलात्कार केला . त्यातून तरुणी गर्भवती राहिल्यावर चंदननगर येथील हॉस्पिटलमध्ये जबरदस्तीने गर्भपात केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी श्रीरामपूर येथील २८ वर्षाच्या तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी इब्राहिम शेख, रोशनबी, परवीन शेख, मंगला आणि मंगलाची मुलगी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Crime

हा प्रकार श्रीरामपूरमधील रमानगर शुभम मंगल कार्यालयाच्या पाठीमागे, खांदेवनगर, कल्पना हॉस्पिटल येथे २०१५, २१ सप्टेबर २०२२ आणि ३ सप्टेबर रोजी साडेतीन ते सायंकाळी सहा या दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांना नोकरी देण्याच्या आमिषाने पुण्यात बोलावले. नाश्त्यामध्ये गुंगीचे औषध देऊन जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले.
त्यातून त्या गर्भवती राहिल्यावर चंदननगर येथील कल्पना हॉस्पिटलमध्ये जबरदस्तीने गर्भपात करुन अनैसर्गिक संबंध ठेवले. फिर्यादीचा गळा आवळून हाताने मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक वंजारी तपास करीत आहेत.