Pune Crime : येरवडा कारागृहात राडा! आंदेकर टोळीतील आरोपींकडून कारागृह अधिकाऱ्याला मारहाण..

Pune Crime पुणे : मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. त्यातच पुण्यातील टोळी युद्ध अनेकांना सर्वश्रृत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती
यातच आहा गुन्हेगारांना पोलिसांनी किंवा अधिकाऱ्यांची भीतीच उरली नसल्याचं शहरात घडलेल्या घटनांमधून दिसून येत आहे.अशातच कुख्यात गुन्हेगार आंदेकर टोळीतील सदस्यांनी येरवडा कारागृहात अधिकाऱ्याला बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केल्याचे समोर आले आहे.
शेरखान पठाण असे मारहाण झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
येरवडा कारागृहात असलेल्या कुख्यात आंदेकर टोळीतील आरोपींनी कारागृह अधिकाऱ्याला येरवडा कारागृहातील मोकळ्या मैदानात मारहाण केली आहे. गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पठाण यांच्यावर दहा ते बारा जणांच्या टोळक्याने हल्ला केला. त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. Pune Crime
यामुळे येरवडा कारागृहात काही प्रमाणात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन दिवसांपूर्वी दहा ते बारा कैद्यांमध्ये आणि शेरखान पठाण यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. येरवडा कारागृहाती इतर अधिकारी या घटनेची माहिती घेत आहेत.
आरोपींनी मारहाण केल्याने पठाण गंभीर जखमी झाले आहेत. आरोपींनी पठाण यांना शिवीगाळ केली. त्यावरुन ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र संपूर्ण चौकशी केल्यानंतर पठाण यांना मारहाणीचं खरं कारण समोर येईल. येरवडा कारागृहात पोलीस दाखल झाले आहे. संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे.