Pune Crime : हिंजवडीत आयटी इंजिनिअर महिलेची गोळ्या झाडून हत्या, लॉजमध्ये सापडला मृतदेह, परिसरात खळबळ…


Pune Crime पुणे : आयटी हब हिंजवडीत एका आयटी इंजिनिअर महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मृतदेह एका लॉजमध्ये सापडल्याने खळबळ उडालेली आहे. ही महिला मागील दोन दिवसांपासून लॉज मध्ये वास्तव्यास होती अशी माहिती मिळाली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी हत्या करणाऱ्या प्रियकराला ताब्यात घेतलं आहे. त्याने प्रेम संबंधांतून आपण ही हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या महारुंजी भागातील सुपर ओयो टाऊन हाऊस इम्पेरियल या लॉजमध्ये ही घटना घडली आहे.

ऋषभ निगम असे अटक करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे.

लखनऊवरुन आलेल्या ऋषभ निगम याने महिलेची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर तो मुंबईला पळून गेला. मात्र पळून जाताना तो मुंबई पोलिसांच्या हातून सुटू शकला नाही. मुंबई पोलिसांनी त्याला नाकाबंदी दरम्यान पिस्टल सह अटक केली. Pune Crime

दरम्यान, प्रेम प्रकरणातून महिलेची हत्या झाल्याचे उघड झालं आहे. पण हिंजवडीत आयटी हबमध्ये एका आयटी इंजिनिअर महिलेची गोळ्या झाडून हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!