Pune Crime : धक्कादायक! भरदिवसा गर्दीने भरलेल्या बसमध्ये तरुणीशी अश्लिल कृत्य, स्वारगेटजवळील प्रकार…


Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

शंकरशेट रोडवरील कुमार पॅसिफिक मॉलसमोरील बसस्टँड वरुन प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये बसलेल्या तरुणींच्या अंगावरुन हात फिरवून तिचा विनयभंग करुन अश्लिल वक्तव्य करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पण, बसमध्ये इतके प्रवासी असतानाही कोणी पुरुष त्याला विरोध करण्यासाठी पुढे आला नाही. शेवटी या तरुणीच्या तीन मैत्रिणींनी त्याला विरोध केल्यावर तो पळून गेला.

याप्रकणी एका १९ वर्षाच्या तरुणीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तुषार सुधीर खाटमोडे (वय. ३४, रा. नारायण पेठ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास स्वारगेट परिसरात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व तिच्या मैत्रिणी शंकरशेट रोडवरील कुमार पॅसिफिक मॉल येथील बसस्टँडवरुन बसमध्ये बसल्या. यावेळी तुषार याने फिर्यादीच्या अंगावरुन हात फिरवून तिचा विनयभंग केला. तेव्हा तिने विरोध केला. Pune Crime

पण बसमधील कोणीही पुरुष त्याला अडवायला पुढे झाला नाही. तेव्हा तिच्या तीन मैत्रिणीने त्याला विरोध केला. त्यांच्यातील एका तरुणीने तुषारचे आयकार्ड हिसकावून घेतले. एका वेळी चार तरुणी त्याला प्रतिकार करु लागल्याचे पाहून तो पळून गेला.

या तरुणींनी त्याच्या आयकार्डवरील नंबरवरुन मोबाईल केला तेव्हा त्याने या तरुणीशी अश्लिल बोलून तु माझी तक्रार केल्यास तुला सोडणार नाही, असे बोलून लज्जास्पद वर्तन केले. पोलिसांनी तुषार खाटमोडे याच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!