Pune Crime : पैशांचा पाऊस! भोंदूबाबाने तरूणाला घातला १८ लाखाचा गंडा, पुण्यातील हडपसर येथील धक्कादायक घटना..

Pune Crime : पुणे शहरातील हडपसर परिसरात असलेल्या ससाणे नगर येथे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाच लाखाचे पैसे बदलून कोट्यावधी रुपयांच्या पैशाचा पाऊस पडतो असे सांगत मांत्रिकाने तरुणाला १८ लाख रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद छोटेलाल परदेशी असे फिर्याद देणाऱ्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भोंदू बाबा आईरा शॉब यांच्यासह माधुरी मोरे, रॉकी वैद्य आणि किशोर पंडागळे अशा चार जणांवर हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी विनोद छोटेलाल परदेशी यांना त्यांच्या मित्रमार्फत एका भोंदू बाबा याच्याशी ओळख झाली. त्याने पैशाचा पाऊस पडतो असे सांगून फिर्यादी यांना एक अघोरी पूजा मांडायला सांगितली. Pune Crime

पूजा सुरू असताना अचानक त्या ठिकाणी काही तोत्या पोलीस आले. त्यांनी बाबासाह तरुणाला मारहाण करत या ठिकाणी पूजेसाठी ठेवलेले १८ लाख रुपये घेऊन पसार झाले. हा सगळा डाव या भोंदू बाबाने रचला असल्याचे समजताच फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी आता या भोंदू बाबासह तिघांचा शोध पोलीस घेत आहेत.

दरम्यान, याप्रकरणी भोंदू बाबा आईरा शॉब यांच्यासह माधुरी मोरे , रॉकी वैद्य आणि किशोर पंडागळे अशा चार जणांवर हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.