Pune Crime : लग्न करतो म्हणून अनेकदा अत्याचार, जातीवाचक शिवीगाळ, पुण्यात अट्रोसिटीचा गुन्हा दाखल…

Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
तुझ्यासोबत मी लग्न करतो असे सांगून महिलेवर वारंवार अत्याचार केले. महिलेने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर तिला जातीवाचक शिवागाळ करुन मारहाण केली. तसेच मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी २६ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सन २०१९ ते जून २०२४ या कालावधीत काळेपडळ, बोराडे नगर परिसरात घडला आहे.
याबाबत ४० वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामेश्वर यशवंत आयनुले (वय.२६ रा. मु.पो. नागदरवाडी, ता. चाकुर जि. लातुर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, आरोपीने पीडित महिलेसोबत ओळख करुन तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने टाळाटाळ केली. Pune Crime
पीडितेने लग्नाबाबत तगादा लावला असता आरोपी रामेश्वर याने जातीवाचक शिवीगाळ करुन लग्न करण्यास नकार दिला. तसेच तिला धमकावले. आरोपीच्या भीतीने व सततच्या भांडणामुळे महिलेने अनेकवेळा घर बदलले.
मात्र, आरोपी महिलेचा शोध घेऊन त्याठिकाणी येऊन तिला मारहाण करत होता. आरोपीने महिलेच्या घरी येऊन तिला व तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.