Pune Crime : ‘माझ्या मित्राला संपवून…’ मित्राच्या मृत्यूसाठी स्मशानात अघोरी पूजा, सोरतापवाडी येथील धक्कादायक घटना..

Pune Crime : पुण्यात गुन्हेगारीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत चाली आहे. दररोज अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत आहे. पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखून १८ लाख रुपयांना गंडा घातल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे.
मित्राच्या मृत्यूसाठी एका व्यक्तीने स्मशानभूमीत जाऊन पूजा केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सोरतापवाडी (ता. हेवली) गावाच्या स्मशानभूमीत घडली आहे.

याप्रकणी गणेश चौधरी याच्या विरोधात पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा तक्रार दाखल करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहिती नुसार, पुण्याजवळील सोरतापवाडीमध्ये राहणाऱ्या त्याचा मित्र अमोल मानमोडे याचा मृत्यू होऊन त्यांच्या कुटुंबाचा सर्वनाश व्हावा म्हणून चौधरीने घातली स्मशानभूमीत अघोरी पूजा घातली होती. Pune Crime
तसेच चौधरी हा रात्री अपरात्री सोरतापवाडीच्या स्मशानभूमीमध्ये जाऊन वेगवेगळ्या अघोरी पूजा घालत असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, गावताल्या लोकांना हा सगळा प्रकार समजताच त्यांना जबर धक्का बसला. त्यानंतर गणेश चौधरी याच्या विरोधात पुण्यातील लोणी काळभोर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
