Pune Crime : सोरतापवाडी स्मशानभूमीत मित्राच्या मृत्यूसाठी अघोरी पूजा प्रकरण, पोलिसांकडून अखेर गुन्हा दाखल..


Pune Crime : मित्राच्या मृत्यूसाठी एका व्यक्तीने स्मशानभूमीत जाऊन पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला होता. ही घटना सोरतापवाडी (ता. हेवली) गावाच्या स्मशानभूमीत घडली होती. या घटनेने पसिरात खळबळ उडाली होती.

या घटनेच्या सखोल तपासानंतर पोलिसांनी गणेश तात्यासाहेब चौधरी (वय अंदाजे ३५ वर्षे, रा. सोरतापवाडी, मारुती मंदिराशेजारी, ता. हवेली, जि. पुणे) याच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ कलम ३ अंर्तगत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकणी सुरभी अमोल मानमोडे (वय ३१ वर्षे, रा. जे २/५०८, मांजरी ग्रीन वुडस, हडपसर पुणे) फिर्याद दिली.

मिळालेल्या माहिती नुसार, पुण्याजवळील सोरतापवाडीमध्ये राहणाऱ्या त्याचा मित्र अमोल मानमोडे याचा मृत्यू होऊन त्यांच्या कुटुंबाचा सर्वनाश व्हावा म्हणून चौधरीने घातली स्मशानभूमीत अघोरी पूजा घातली होती. Pune Crime

गणेश चौधरी हा अवैध सावकार आहे. पुण्याजवळील सोरतापवाडीमध्ये राहणारा त्याचा मित्र अमोल मानमोडे याचा मृत्यू होऊन त्यांच्या कुटुंबाचा सर्वनाश व्हावा म्हणून चौधरीने चक्क स्मशानभूमीत ही अघोरी पूजा घातली. एवढेच नव्हे तर त्याच्या कुटुंबाचा नाश व्हावा यासाठी त्याने चक्क मंत्राचे पठण देखील केले.

गावताल्या लोकांना हा सगळा प्रकार समजताच त्यांना जबर धक्का बसला. त्यानंतर गणेश चौधरी याच्या विरोधात पुण्यातील लोणी काळभोर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सोरतापवाडीच्या स्मशानभूमीमध्ये चौधरी हा रात्री- अपरात्री जाऊन वेगवेगळ्या अघोरी पूजा घालत असल्याची माहिती यानिमित्ताने उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली. ता याप्रकणी गणेश तात्यासाहेब चौधरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!