Pune Crime : रिक्षाचालकाकडून अल्पवयीन कॉलेज तरुणीचा विनयभंग, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल..


Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

कॉलेज तरुणीचा वेळोवेळी पाठलाग करुन लग्नासाठी जबरदस्ती केली. तसेच तिचा हात पकडून गैरवर्तन केल्याप्रकरणी रिक्षाचालकावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Crime

हा प्रकार जानेवारी २०२३ ते शनिवार (ता.२३) डिसेंबर या दरम्यान तरुणीच्या घराच्या व कॉलेज परिसरात तसेच ग्लायडिंग सेंटर व कॅम्प येथे घडला आहे. या दरम्यान तरुणीच्या घराच्या व कॉलेज परिसरात तसेच ग्लायडिंग सेंटर व कॅम्प येथे घडला आहे.

याप्रकरणी हडपसर परिसरातील काळेपडळ येथे राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने सोमवारी (ता.२५) हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश पाटील (वय.२७ रा. खंडोबा माळ, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी महेश पाटील रिक्षाचालक आहे. त्याने फिर्यादी तरुणीचा तिच्या राहत्या घराच्या परिसरात तसेच ग्लायडिंग सेंटर येथे पाठलाग केला. फिर्यादी कॉलेजला गेल्या असता पाटील याने कॉलेज परिसरात तरुणीचा पाठलाग केला.

तसेच तरुणीचा हात पकडून त्याच्यासोबत लग्न करण्याची जबरदस्ती केली. त्यवेळी तरुणीने हात झटकून त्याच्या सोबत लग्नाला नकार दिला. यामुळे चिडलेल्या आरोपीने तरुणीला व तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कामठे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!