Pune Crime : पुण्यातील उच्चभ्रू वस्तीत जादूटोन्याचा प्रकार, घरच्यांनी महिलेची साडी चोरली अन्…; घटनेने उडाली खळबळ
Pune Crime पुणे : उच्चभ्रू असलेल्या कोथरूड तसेच जनवाडी इथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रॉपर्टीच्या कारणावरून आजी, मामा, सावत्र आई, भाऊ आणि चुलत बहीण यांनी घरातील महिलेची साडी चोरून त्यावर जादूटोण्याचा अनिष्ट व अघोरी कृत्य केल्याची घटना घडली आहे. Pune Crime
याप्रकरणी अनिकेत सुपेकर यांनी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून त्यानुसार कांता सुरेश चव्हाण वय ७०, गिरीश सुरेश चव्हाण वय ३५, संगीता सुपेकर वय ४५, स्वप्नील सुपेकर वय २३, सोनल प्रवीण सुपेकर वय ३०, देवरुशी स्वप्नील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांच्या आजी, मामा, सावत्र आई, भाऊ आणि चुलत बहीण यांनी संगनमत करून कट रचून प्रॉपर्टीच्या कारणावरून तसेच फिर्यादी यांच्या वस्तीतील मुलगा कृष्णा चांदणे याने त्याचे पत्नीच्या कारणावरून फिर्यादीचे मामा यांना मारले होते. याचा राग मनात धरून महिलेच्या आईची साडी चोरली होती.
त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांवर करणी करण्याचा कट रचला होता. त्यासाठी आईची साडी तसेच फिर्यादीची आई सुनिता सुपेकर, मावशी अनिता चव्हाण, काकु आशा सुपेकर व कृष्णा चांदणे याचे फोटो ठेवुन फोटोचे व साडीचे बाजुला अंडी, टाचणे लावलेले लिंबू, भात कसले तरी काळीज, मटण, हळद, कुंकु, अगरबत्ती ठेवुन करणी करता जादू टोण्याचे अनिष्ट व अघोरी कृत्य केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी आरोपी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहे.