Pune Crime : बंदुकीचा धाक दाखवून पुण्यात सोन्याच्या दुकानात मोठा दरोडा, घटनेने उडाली खळबळ…


Pune Crime : बी टी कवडे रस्त्यावर अरिहंत ज्वेलर्स मध्ये बंदुकीचा धाक दाखवून तीन जणांनी सोन्याच्या दुकानात दरोडा टाकला आहे. ही घटना रविवारी रात्री सव्वा नऊ वाजता घडली असून यामध्ये दुकानदार किरकोळ जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, बी टी कवडे रस्ता परिसरात बसेरा कॉलनीत वालचंद ओसवाल यांचं सोन्याचं दुकान आहे. वालचंद दुकानात बसले होते, तर मुलगा तुषार चहा आणण्यासाठी जवळच्या चौकात गेला होता. ही संधी साधून रात्री सव्वा नऊ वाजता दुचाकीवर तीन तरुण तोंडाला बांधून आले, दोघेजण दुकानात घुसले, लगेच शटर अर्धे बंद केले.

दरम्यान, दुकानदाराला बंदुकीचा धाक दाखवून डोळ्यांवर स्प्रे मारला. हातातील कोयता पाठीत मारून सोन लुटले. त्याचवेळी दुकानदार जोरात ओरडला त्यामुळे शेजारचे दुकानदार व ग्राहक पळत आले. शटर बंद पाहून ‘चोर चोर’ म्हणून ओरडले. यामुळे चोर घाबरले आणि हातात बसले तेवढे सोनं घेऊन बाहेर पळाले. Pune Crime

तसेच हातात बंदूक व कोयता असल्याने रस्त्यावर उभे असलेल्या लोक घाबरले. त्यामुळे चोर पळून जाण्यात यशस्वी ठरले. घटनेची तात्काळ माहिती ओसवाल यांनी मुंढवा पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब निकम हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली.

दरम्यान, याप्रकरणी वालचंद ओसवाल यांच्या तक्रारीवरून मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत. रहदारीच्या परिसरात ही घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!