कोरोना दिवसेंदिवस वाढतोय! गेल्या 24 तासात 6 हजार रुग्ण, पुण्यात कोरोना वार्ड सुरू…!

पुणे : देशात कोरोना प्रादुर्भावात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे. रोज देशातील नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या 24 तासांत देशात कोरोना व्हायरसच्या 6050 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. नव्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 28, 303 वर पोहोचली आहे. यामुळे मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापूर्वी गुरुवारी 5,335 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसमुळे 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तसेच कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची देशातील एकूण संख्या 5 लाख 30 हजार 943 वर पोहोचली आहे. यामुळे येणाऱ्या काळात काळजी घ्यावी लागणार आहे.