पुण्यातील कंत्राटदार आयुष्यातून उठला ; मला प्रेग्नेंट करा, 25 लाख देईन,, महिलेची अजब ऑफर…


पुणे : पुण्यातील एका 44 वर्षीय कंत्राटदाराच आयुष्य सोशल मीडियावरच्या एका व्हिडिओमुळे उध्वस्त झाल आहे.एका महिलेने, मला असा पुरुष हवा जो मला प्रेग्नंट करेल आणि मी त्याला 25 लाख रुपये देईन असे म्हटले आहे. त्यानंतर एक कॉन्ट्रॅक्टर त्या ऑफरला भाळून तयार झाला आणि त्याने त्या व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबर वर कॉल केला. त्यानंतर तो जाळ्यात फसला.

समोर आलेल्या माहितीनुसार, कंत्राटदाराने कॉल लावल्यानंतर त्या व्यक्तीने स्वतःला ‘प्रेग्नेंट जॉब‘ कंपनीचा असिस्टंट असल्याचे सांगितले. त्याने कंत्राटदाराला सांगितले की,या कामासाठी त्याला आधी कंपनीमध्ये नोंदणी करावी लागेल, तेव्हाच त्याला आयडी कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे मिळतील. त्यानंतर पैशांचा खेळ सुरू झाला. आधी नोंदणी फी, नंतर आयडी कार्डचा चार्ज, नंतर व्हेरिफिकेशन, जीएसटी, टीडीएस, प्रोसेसिंग फी… प्रत्येक वेळी काही ना काही नवे बहाणे काढले गेले. असे मिळून त्याच्याकडून 11 लाख रुपये उकळले गेले.

कंत्राटदाराने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ते २३ ऑक्टूबरपर्यंत सुमारे १०० पेक्षा जास्त वेळा ऑनलाइन ट्रान्सफर केले, कधी UPI ने, कधी IMPS ने. एकूण रक्कम होती सुमारे ११ लाख रुपये पर्यंत पोहचली. मात्र त्यानंतरफसवणुक झाल्याचे कळताच कंत्राटदाराने बनर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आता त्या मोबाईल नंबरांची आणि बँक खात्यांची तपासणी सुरू केली आहे ज्यात पैसे पाठवले गेले होते.

दरम्यान एका तपास अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ही चोरी फक्त पुण्यापुरती मर्यादित नाही. देशाच्या अनेक भागांतून अशी प्रकरणे समोर येत आहेत. सोशल मीडियावर बनावट व्हिडीओ टाकून लोकांना मोठ्या पैशांचे आमिष दाखवले जाते आणि नंतर वेगवेगळ्या नावांनी पैसे उकळले जातात.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!