NEET पेपरफुटी प्रकरणात पुणे कनेक्शन; ब्युटी पार्लरच्या आडून सुरू होतं मोठं रॅकेट? WhatsApp चॅटमधून धक्कादायक खुलासा


पुणे : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता पुण्यापर्यंत पोहोचले असून पुणे पोलिसांनी बिबवेवाडी परिसरातून एका महिलेची चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मनीषा वाघमारे (वय ४६) असे या महिलेचे नाव असून ती पेपरफुटी आणि ॲडमिशन रॅकेटशी संबंधित संशयितांना मदत करत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा वाघमारे ही बिबवेवाडीत ब्युटी पार्लर चालवत होती. मात्र, या पार्लरच्या आडून विद्यार्थ्यांना आरोपींपर्यंत पोहोचवणे आणि ॲडमिशनसंदर्भातील व्यवहार करण्यात येत असल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी तिचे मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर तांत्रिक उपकरणे जप्त केली आहेत. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरमधून ताब्यात घेतलेल्या धनंजय लोखंडे याच्याशी मनीषाचा सातत्याने संपर्क होता. दोघांमधील WhatsApp चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्सही पोलिसांच्या हाती लागले असून पेपरफुटी प्रकरण उघड झाल्यानंतरही त्यांच्यात संपर्क सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे.

दरम्यान, बिबवेवाडीतून ताब्यात घेतल्यानंतर मनीषा वाघमारेची सुमारे तीन तास कसून चौकशी करण्यात आली. विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळवून देण्यापासून ते पेपर पोहोचवण्याच्या प्रक्रियेपर्यंत तिचा सक्रिय सहभाग असल्याचे संकेत तपासातून मिळत आहेत. या प्रकरणात पुढील चौकशीसाठी तिला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) ताब्यात दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!