Pune : पुणेकरांनो पुण्यात आज पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून अलर्ट जारी, जाणून घ्या…

Pune : राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे, हवामान विभागाकडून आज देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अशातच आज आणि उद्या पुणे शहर परिसरात आज बुधवारी मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.

मात्र, गुरुवार (ता.१२) ते रविवार (ता. १५सप्टेंबर) यादरम्यान पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

तसेच शहरात २ सप्टेंबरनंतर राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कमी झाला आहे. काही भागात सरी बरसताना दिसत आहे. पुणे शहर परिसरासह घाटमाथ्यावरही (आज आणि उद्या) मंगळवारी आणि बुधवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. Pune

त्यानंतर पाऊस दडी मारण्याची शक्यता आहे. शहरात १५ सप्टेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहील. काही भागांत या कालावधीत रिमझिम पावसाचा अंदाज आहे. राज्यात काही भागात मंगळवारी आणि बुधवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मात्र, गुरुवारपासून (१२ सप्टेंबर) पुढे किमान पाच दिवसांचा खंड आहे. एकूणच, मान्सून परतीच्या प्रवासाच्या मूडमध्ये आहे. राज्यात १२ सप्टेंबरपासून पावसाचं प्रमाण कमी होत आहे. मात्र, मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची अधिकृत घोषणा अद्याप हवामान विभागाकडून करण्यात आलेली नाही.
