Pune : मस्तच! प्रवाशांची लालपरी झाली डिजीटल, आता एसटी तिकीटाचे पैसे ऑनलाइन देता येणार, महामंडळाकडून क्यूआर कोडची सुविधा..
Pune पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये प्रवाशांना तिकिटाची रक्कम ऑनलाइन देता येणार आहे. महामंडळाने प्रवाशांना ‘क्यूआर कोड’ उपलब्ध करून दिला आहे. यामुळे प्रवाशांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.
आता प्रवाशांना ऑनलाईन सुविधा मुळे सुट्टे पैसे आहे कि नाही ह्या गोष्टींचा विचार देखील करण्याची गरज नाही. या गोष्टीमुळे प्रवाशांचा वादा वाद टाळण्यासाठी एसटीने पहिल्या टप्प्यात ‘क्यूआर कोड’च्या मदतीने तिकीट देण्याची सोय केली आहे.
सध्याच्या काळात सगळेच स्मार्टफोन वापरत आहे. चहाच्या दुकानापासून तर मॉलवाल्यापर्यंत सर्वत्र ग्राहक ऑनलाईन पैसे देतात. सर्व व्यवहारांत कॅशलेसवर भर देण्यात येत असताना, एसटीचे तिकीट रोख रक्कम देऊनच काढावे लागत होते. त्यामुळे वाहक आणि ग्राहकांची सुट्ट्या पैशांवरून सातत्याने वादावादी होत होती. Pune
दरम्यान, पुढील टप्प्यात प्रवाशांना डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून तिकीट काढण्याची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रोख रक्कम बाळगण्याची आवश्यकता भासणार नाही. या प्रयत्नांमुळे वाहकांचीही रोख रक्कम सांभाळण्यापासून सुटका होणार आहे. महामंडळाने सर्व विभागांना ही सेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.