Pune : कोरेगावमूळ ते बिवरी मुळा-मुठा नदीवरील पुलासाठी ३२ कोटींचा निधी देऊन मंजुरी देणाऱ्या मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आमदार राहुल कुल व प्रदिप कंद यांनी मानले आभार! पुलाच्या कामाला होणार लवकरच सुरुवात…!!

Pune उरुळीकांचन : पूर्व हवेली तालुक्यात मुळा- मुठा नदीवरील कोरेगावमूळ ते बिवरी, वाडेबोल्हाई गावांसह पुणे -सोलापूर व पुणे- नगर महामार्गाला जोडण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणाऱ्या मुळा मुठा नदीवरील पुलासाठी ३२कोटी रुपये नदीपुलाला मंजुरी दिल्याबद्दल पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदिप कंद व दौंडचे आमदार राहुल कुल यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट घेऊन आभार मानले आहे.
पूर्व हवेली तालुक्यातील मुळा-मुठा नदीवर कोरेगावमुळ ते बिवरी,अष्टापूर या पुलाची मागणी अनेक वर्षेपासून प्रलंबित होती. कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यावरून या भागातील वाहतुक ३० वर्षे उलटून सुरू होती. एकेरी वाहनाची वाहतुक व अतिशय धोकादायक पध्दतीने अनेक वर्षे ग्रामस्थ व प्रवासी या वाहतुक करीत होते . ऊस शेती वाहतुकीसह प्रवासी वाहतुकीला हा मार्ग महत्त्वाचा असल्याने या ठिकाणी नदीवर पुल निर्माण व्हावा म्हणून नागरीक मागणी करत होते. खडकवासला धरणातून अधिक पाण्याचा प्रवाह नदीत सोडल्यास हा कोल्हापूर बंधाऱ्यावरचा मार्ग बंद होऊन या मार्गावरील वाहतुक ठप्प होत होती. तसेच पुलाची आवस्था धोकादायक झाल्याने या मार्गावरुन पुलाची मागणी सातत्याने होत होती. Pune
या मार्गांसाठी ज्येष्ठ नेते व हवेली बाजार समितीचे संचालक प्रकाश जगताप व कोरेगावमूळचे सरपंच मंगेश कानकाटे यांच्यासह ग्रामस्थांनी या पुलाची मागणी केली होती. या कामासाठी दौंडचे आमदार राहुल कुल व जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप कंद यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याशी पाठपुरावा करुन नाबार्ड मार्फत ३२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. महिन्याभरात टेंडर प्रक्रीया होऊन कामाचा शुभारंभ होणार आहे. या पुलाला मंजुरी दिल्याबद्दल रविंद्र चव्हाण यांचे शुक्रवार( दि.२३ ) रोजी पुण्यात आमदार राहुल कुल व प्रदिप कंद यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले आहे.