Pune : कात्रज घाटात रुग्णांच्या रक्ताच्या त्या बाटल्या फेकने आले अंगलट, पुण्यातील बड्या लॅबवर मोठी कारवाई..


Pune : पुणे येथील जुन्या कात्रज घाटात रुग्णांचे रक्ताच्या नमुने घेतलेले इंजेक्शन आणि बाटल्या रस्त्याच्या कडेला फेकून देण्याचा प्रकार घडला होता. यामुळे याबाबत अनेकांनी तक्रार केली होती. आता महानगरपालिकेने एन. एम. हेल्थकेअर सर्व्हिसेस या लॅबला एक लाखांचा दंड केला आहे.

जुन्या कात्रज घाटात रस्त्याच्या कडेला इंजेक्शन आणि रक्त तपासणी केलेल्या बाटल्या व इतर औषधांचा साठा पोत्यात भरून टाकला असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यामुळे याचा प्राणी मित्र बाळासाहेब ढमाले यांनी व्हिडिओ आणि छायाचित्र काढून महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाकडे तक्रार केली होती.

तसेच संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती. अखेर याबाबत महानगरपालिकेने पाऊल उचलले आहे. महानगरपालिकेचे संदीप कदम यांनी गांभीर्याने दखल घेतली. रक्त तपासणी लॅबचा शोध घेतला असता धनकवडी येथील नीलम पाटील मालक असलेल्या एन. एम. हेल्थकेअर सर्व्हिसेस या लॅबच्या असल्याचे समोर आले. Pune

रुग्णाच्या उर्वरित नमुन्यांच्या बाटल्या भरलेली पोती जुन्या कात्रज घाटात टाकून दिले होते. याबाबत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या लॅबवर एक लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तसेच त्यांना हा कचरा उचलण्याचे देखील आदेश दिले आहेत.

पुण्यातील ही वैद्यकीय तपासणी करणारी कंपनी आहे, ही कंपनी कामगारांचे वैद्यकीय तपासणीच्या नावाने गोळा केलेले रक्ताचे नमुने कोणतीही प्रक्रिया न करता व रक्ताचे नमुने न तपासता कात्रज घाट व इतर ठिकाणी फेकून देते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!