Pune Accident News : नवले चौकात भीषण अपघात, दोन वाहनांवर उलटला सिमेंटने भरलेला ट्रक, दोनजण गंभीर जखमी..


Pune Accident News पुणे : कात्रजकडून नवलेच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर नवले चौकात अचानक सिग्नल लागल्याने सिमेंट ने भरलेला ट्रक दोन वाहनांवर उलटल्याची घटना समोर आली आहे.

ही घटना शनिवारी (ता.१४) सकाळी १०.२० च्या सुमारास घडली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. तसेच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Pune Accident News

मिळालेल्या माहितीनुसार, कात्रजकडून येणार ट्रक ( एमएच ४२ बीएफ ८२८३ ) नवलेच्या दिशेने जात होता. दरम्यान नवले चौकात गतिरोधकाच्या ठिकाणी अचानक सिग्नल लागला. मात्र ट्रक चालकाला ट्रकवर नियंत्रण मिळवता आला नाही. त्याने सिग्नलवर येऊन एकदम ब्रेक लावला.

त्यामुळे ट्रक एका वाहनावर आणि दुचाकीवर उलटला. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. दरम्यान या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, अपघातानंतर नवले चौकातील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. चौकातील सिग्नल बंद करून वाहतूक सुरळीत करण्यात आली तसेच क्रेनच्या साहाय्याने वाहने हटविण्याचे काम सुरू आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!