संतापजनक! पुण्यात भररस्त्यात छेड काढून तरुणीचा विनयभंग, दोघांवर गुन्हा दाखल..

पुणे : भररस्त्यात तरुणींची छेड काढून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना आंबेगाव पठार परिसरात घडली आहे. ही घटना शनिवारी ( ता. १९) रोजी रात्री अकराच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवम मेघावत आणि पियुष भरम (रा. आंबेगाव पठार) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबात पीडित मुलीच्या आईने (वय. २७) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी या मैत्रिणी सोबत मेडिकल मध्ये जात होत्या. त्यावेळी दोन तरुणांनी त्यांचा पाठलाग करुन फिर्यादी यांच्या मुलीला ‘तुला मी घरी सोडतो’ असे म्हणाले. त्यावरून आरोपी आणि महिला यांच्यात वाद झाला.
यावरुन पियुष भरम याने फिर्यादी महिलेच्या मुलीच्या कानाखाली मारून शिवीगाळ केला. तसेच शिवम मेघावत याने मुलीच्या हाताला धरून शिवीगाळ करत, तिला जवळ ओढून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यावेळी फिर्यादी यांच्या मैत्रीणीचे आई-वडील येत असल्याचे पाहून आरोपी पळून गेले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.