Pune : खेड शिवापूर पोलिस चौकीत घुसून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण, पसार झालेल्या आरोपीला बेड्या…


Pune : राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खेड शिवापूर पोलीस चौकीमध्ये एका पोलीस हवालदारावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. शिवीगाळ करत एका व्यक्तीने पोलीस कार्यालयात घुसून पोलीस अंमलदाराला डोक्यामध्ये खुर्ची घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून पसार झाला.

पसार झालेल्या आरोपीला स्वारगेट पोलिसांनी गुलटेकडी परिसरात सापळा रचून पकडले आहे. आरोपीने गुन्हयाची कबुली दिल्याने त्याला पुढील तपासासाठी राजगड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

रोहन गौतम साळवे (वय २४ , रा. कल्याण ता.हवेली पुणे) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी पोलीस हवालदार राहुल कोल्हे हे राजगड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेड शिवापूर दूरक्षेत्र हवेली तालुक्यातील श्रीरामनगर येथे नेमणुकीस आहेत.

पोलिस चौकीमध्ये रविवारी रात्री कोल्हे हे कर्तव्यावर काम करत असताना रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास आरोपी रोहन अनधिकृतरीत्या पोलिस चौकीमध्ये आला. रोहन याने फिर्य़ाद यांना शिवीगाळ करत कार्यालयातील खुर्ची संगणकावर मारली.

आरोपीने संगणक आणि इतर सरकारी मालमत्तेची तोडफोड करुन ५० हजार रुपयांचे नुकसान केले. तसेच त्यांच्या डोक्यात खुर्ची घालून साहित्याचे नुकसान करून आरोपी रोहन पसार झाला होता. त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणणे आणि पोलीस कर्मचा-याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्यावर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune

दरम्यान, या गुन्हयातील आरोपी हा स्वारगेट येथील गुलटेकडी परिसरामध्ये आल्याबाबत स्वारगेट पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अंमलदार अनिस शेख व रमेश चव्हाण यांना माहिती मिळाली. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे , पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले व पोलीस अंमलदार अनिस शेख, रमेश चव्हाण, सोमनाथ कांबळे यांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला.

आरोपी दिसल्यानंतर शिताफीने त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे गुन्हयाची चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. त्याला पुढील तपासासाठी राजगड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!