अखेर पेट्रोल डिझेलचे दर होणार कमी, अर्थमंत्र्यांचे मोठे वक्तव्य…!

नवी दिल्ली : सध्या पेट्रोल डिझेलचे दर हे गगनाला भिडले आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा फटका बसत आहे. असे असताना आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठे संकेत दिले आहेत. यामुळे तुम्हाला दिलासा मिळू शकतो. केंद्रीय स्थरावर याबाबत विचार सुरू आहे.

जर राज्य तयार असेल तर पेट्रोलियम उत्पादने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अंतर्गत आणता येतील, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. यामुळे याबाबत आता लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत येणाऱ्या काळात बैठक होणार आहे.
अर्थमंत्री म्हणाल्या, पेट्रोलियम उत्पादने जीएसटीच्या कक्षेत आणण्याची तरतूद आधीपासूनच आहे. पाच पेट्रोलियम उत्पादने कच्चे तेल, पेट्रोल, हायस्पीड डिझेल, नैसर्गिक वायू आणि विमान इंधन जीएसटीच्या बाहेर आहेत. याचा मोठा फटका अनेकांना बसत आहे.

जीएसटी परिषदेने ही उत्पादने जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या तारखेचा विचार केला पाहिजे. राज्यांनी सहमती दिल्यानंतर आम्ही पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आणू. पेट्रोलियम पदार्थांना जीएसटीच्या कक्षेत आणले तर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील, यामुळे येणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.