प्रतिभा काकींचा पवारांच्या निर्णयाला फुल्ल सपोर्ट, म्हणाल्या साहेब निर्णय मागे घेऊ नका
मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर वाय बी चव्हाण सेंटरमध्ये अभूतपूर्व गोंधळ झाला. कार्यकर्ते घोषणा देऊ लागले, नेते समजावू लागले. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल वगळता सगळ्या नेत्यांनी आपण निर्णय मागे घ्यावा, अशी एकमुखी मागणी केली.
असे असताना आता पवार यांच्या पत्नी प्रतिभा काकी- तुमचा निर्णय योग्यच असल्याचे सांगत शरद पवार यांच्या मागे उभ्या राहिल्या. आपण निर्णय मागे घेऊ नका, असे पवारांच्या कानात सांगत राहिल्या.
आपला निर्णय योग्यच आहे. हा निर्णय घ्यावाच लागणार होतो. तुम्ही आपल्या निर्णयावर ठाम राहा, कार्यकर्ते नेत्यांच्या मागणीवर निर्णय मागे घेऊ नका, असं प्रतिभाकाकी शरद पवार यांना सांगत राहिल्या.
कार्यकर्ते रडत होते. पण प्रतिभा काकी शरद पवार यांना स्मितहास्याने साथ देत होत्या. त्यामुळे शेवटपर्यंत शरद पवार यांनी नेते कार्यकर्त्यांचं न ऐकता आपल्या निर्णयावर ठाम राहिले.