Prakash Ambedkar : मनोज जरांगेंना शरद पवारांचा पूर्ण पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट…

Prakash Ambedkar : विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार हे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी संपूर्णपणे प्रयत्न करतील, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. शरद पवार हे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच आहेत, हे आता स्पष्ट झाले असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणामुळे आता पुन्हा एकदा मराठा विरूध्द ओबीसी वाद राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे.
त्यातच मराठा आरक्षणाच्या मागणीला आमाचा पाठिंबा आहे, पण इतर लहान समाजानांही सोबत घ्यावं, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली आहे. यावरूनच आंबेडकरांनी आरोप केला आहे. Prakash Ambedkar

आंबेडकरांनी म्हणाले की, हे आता स्पष्ट झाले आहे की, शरद पवार जरांगे पाटील यांच्याबरोबर आहेत. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीला शरद पवारांचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यासाठी ते निवडणुकीनंतर प्रयत्न करतील. असे वाटत आहे.