Pradeep Kand : प्रदीप कंद यांची ट्रान्सफॉर्मरबाबत फडणवीसांकडे सूचना! दहा वर्षांचा शिरुर ते शिंदोडीचा प्रलंबित वीजेचा प्रश्न चुटकीत सुटला….


Pradeep Kand :  शिरूर तालुक्यातील शिरूर ते शिंदोडी पर्यंत विद्युत पुरवठा करणाऱ्या मल्लिकार्जुन फिडर वरील गेल्या दहा वर्षाचा प्रलंबित असणारा अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न प्रदीप कंद व आमदार राहुल दादा कुल यांच्या माध्यमातून मार्गी लागला. यामुळे अनेकांची अडचण दूर होणार आहे.

मल्लिकार्जुन फीडर वरती गेल्या दहा वर्षांपूर्वी निमोणे येथे पावर हाऊस झाले आहे .मात्र या ठिकाणी 81 अतिरिक्त अकरा केवीएच्या ट्रांसफार्मर ची गरज होती. गेले दहा वर्ष या भागातील शेतकरी सातत्याने ट्रान्सफॉर्मर ची मागणी करत होते. ट्रान्सफॉर्मर नसल्यामुळे सारखा ओव्हरलोड होऊन लाईट जाणे शेतामध्ये पाणी गेलं की लगेच लाईट जाणे अशा अनेक समस्यांना या भागातील शेतकरी तोंड देत होते. Pradeep Kand

या गंभीर प्रश्नाबाबत निमोने गावचे आप्पाराव काळे मोटेवाडीचे सरपंच लालासाहेब कोल्हे, शिंदोडीचे दौलतराव खेडकर पाटील यांनी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद व आमदार राहुल कुल यांच्या कानावर हा विषय घातल्यानंतर त्यांनी या विषयाची अधिकारी स्तरावरील व्यवस्थित माहिती घेऊन हा प्रश्न शासन दरबारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडला.

माझ्या मतदार संघातील या लोकांना न्याय मिळाला पाहिजे व मला तात्काळ ट्रान्सफॉर्मर मिळावेत अशा स्वरूपाचे आग्रही मागणी कंद यांनी केली. आमदार राहुल दादा कुल यांच्या माध्यमातून या पाठपुराव्याला यश म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत निर्णय घेतला. यामुळे तात्काळ 63 ट्रान्सफॉर्मर 11kv चे उपलब्ध करून दिले आहे.

ट्रांन्सफार्मर बसविण्याचे काम तात्काळ सुरू करण्याच्या आदेश प्रशासनाला देण्यात आले. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण असून या भागातील सर्व शेतकऱ्यांनी प्रदीप कंद व आमदार राहुल कुल व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!