पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळणार 82000 रुपये, कोणती आहे योजना?


पुणे :सामान्य गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये अनेक उत्तम बचत योजना आहेत. त्यापैकीच एक गुंतवणूक योजना म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यावर फक्त व्याजातून 82000 चा परतावा मिळू शकतो.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही सरकारी योजना आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेत फक्त ५ वर्षांसाठी गुंतवणूक केली तर व्याजातून 82000 रुपयांपेक्षा जास्त पैसे कमवू शकतात.याचसोबत दर महिन्याला एक ठरावीक रक्कमदेखील मिळू शकते.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही 60किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांसाठी आहे. या योजनेत तुम्ही किमान 1000 रुपयांपासून ते 30लाख रुपये गुंतवू शकतात. योजनेच्या मॅच्युरिटीचा कालावधी 5वर्षे आहे. यानंतर पुढील 3 वर्षासाठी कालावधी वाढवू शकतात.

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत 8.2% टक्के व्याजदर मिळते. या योजनेचे व्याजदर तिमाही आधारावर निश्चित केले जाते. हे व्याजदर वार्षिक आधारावर जमा केले जाते. या योजनेत किमान गुंतवणूक एक हजार रुपये आणि कमाल 30 लाख रुपये आहे.

जर 2लाख रुपये एकरकमी गुंतवले तर 5 वर्षांच्या मुदतीनंतर 8.2 टक्क्यांनी व्याज मिळेल.यानुसार, फक्त व्याजातून तुम्ही 82000 रुपये मिळवू शकतात. म्हणजेच तुम्हाला मूदतीनंतर 2,82,000 रुपये मिळणार आहे. पोस्टाच्या प्रत्येक जबरदस्त योजनेची कोणतीही जोखीम नसते याची हमी असते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!