Pooja Khedkar : पूजा खेडकर आणि कुटुंबीय पूर्ण अडकलं, आता पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवला…

Pooja Khedkar : वादग्रस्त ट्रेनी आयएएस पूजा खेडकर यांची सध्या सर्वत्र चर्चा रंगलेली असतानाच वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाने एक नवीन वळण घेतले आहे. पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय दिवसेंदिवस खोलात जात असल्याचं पाहायला मिळत आहे
आधी ट्रेनी असतानाही आयएएस यांनी जिल्हाधिकारी असल्याप्रमाणे केलेला रुबाब, त्यांच्या खाजगी गाडीवर लावलेला लाल दिवा आणि त्यानंतर आई मनोरमा खेडकर यांनी पिस्तुल हातात घेत, शेतकऱ्यांवर केलेली दादागिरी यांसह समोर आलेल्या अनेक प्रकरणांमुळे आता पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयाच्या अडचणींत आणखी वाढ होणार आहे. या प्रकरणाचा अहवाल राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लायांनी मागवला आहे. Pooja Khedkar
वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांची पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा शासकीय निवासस्थानी भेट घेतली. वाशिमच्या शासकीय विश्रामगृहात पोलिसांनी खेडकरांची भेट घेतली. खेडकरांची पोलिसांनी बंद दाराआड साडेतीन तास माहिती घेतली. वाशिम जिल्हाधिकारी यांच्या परवानगीनं खुद्द पूजा खेडकर यांनी पोलिसांना काही माहिती देण्याची इच्छा व्यक्त केली होती.
उपविभागीय महिला पोलीस अधिकारी नीलिमा आरज यांच्यासह दोन महिला पोलीस अधिकाऱ्यांनी वाशिमच्या विश्रामगृह इथं पोहोचून पूजा खेडकर यांच्याकडून आरोपांसंदर्भात माहिती घेतली.
दरम्यान, ट्रेनी आयएएस पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मागवला आहे. खाजगी गाडीवर अंबर दिव्याच्या वापर करणं, तसेच पुजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी पिस्तूलाचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावणं यांसह पुजा खेडकर त्यांच्या प्रशिक्षण कालावधीत कुठल्या कुठल्या कार्यालयात गेल्या होत्या, याचा अहवाल रश्मी शुक्ला यांनी स्थानिक पोलिसांकडून मागवला आहे. दुसरीकडे केंद्र सरकारच्या वतीनं अतिरिक्त सचिव दर्जाचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करणार आहेत.