Pooja Khedkar : IAS पूजा खेडकर यांच्या आईवर मोठी कारवाई! पिस्तुल हातात घेऊन शेतकऱ्यांना धमकावणे पडले महागात…

Pooja Khedkar : वादग्रस्त ट्रेनी आयएएस पूजा खेडकर यांची सध्या सर्वत्र चर्चा रंगलेली असतानाच त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा अरेरावी करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बंदुक घेऊन मुळशीतल्या शेतकऱ्यांना धमकावल्याचा हा व्हिडिओ आहे.
आता याप्रकरणी खेडकर यांच्याविरोधात पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामध्ये मनोरमा या बंदबक दाखवून एक शेतकऱ्याला धमकावत असल्याचे दिसत होते.
याचप्रकरणी त्यांच्यावर गु्न्हा दाखल झाला आहे. मनोरमा खेडकर यांच्यासह दिलीप खेडकर, अंबादास खेडकर, दोन पुरुष बाउंसर, दोन महिला बाउन्सर आणि घटनेवेळी त्यांच्यासोबत आलेल्या इतर गुंड व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pooja Khedkar
दरम्यान, शेतकरी पंढरीनाथ कोंडीबा पासलकर यांच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल झाला. कलम 323, 504, 506, 143, 144, 147, 148, 149, 3, 25 या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये बेकायदा पिस्तूल बाळगून धमाकावल्याप्रकरणीचं सुद्धा कलम लावण्यात आलं आहे. त्यामुळे आता मनोरमा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसत आहे.