Politics News : शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार? राजकारणात एकच खळबळ उडवणारी माहिती आली समोर, ‘असा’ असेल प्लॅन…

Politics News : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असतानाच दुसरीकडे शिंदे गटाच्या विलिनीकरणाची भाजपकडून रणनीती आखली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवल्यास भाजपने हा प्लान बी तयार ठेवल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. Politics News
मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतीच शिवसेनेच्या १६ आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी घेतली आहे. यावेळी ठाकरे आणि शिंदे गटाच्या बाजूने जोरदार युक्तीवाद केला आहे. लवकरच या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. Politics News
दरम्यान, १० जानेवारीला या संदर्भात निकाल देण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच भाजपने मोठी रणनीती आखल्याची समोर आली आहे. जर शिंदे गटाचे आमदार अपत्र ठरवले किंवा शिंदे गटाचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आले तर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे आमदार हे भाजपमध्ये विलीन होतील. अशी रणनीती भाजपचे आखल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.