Politics News : शरद पवारांचा फडणवीसांना दे धक्का!! ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीत येणार, भाजपचं गणित बिघडणार..

Politics News : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच आगामी काळात म्हणजेच साधारण ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती तसेच महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) अध्यक्ष शरद पवार भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. उदगीरचे भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव ११ जुलै रोजी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीने महायुतीला मोठा धक्का दिला आहे. यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी भाजपला पराभूत करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या शिवसंकल्प यात्रेत उद्धव ठाकरे यांनी माजी उपमहापौर आणि काही नगरसेवकांना आपल्या पक्षात समाविष्ट करून भाजपला धक्का दिला होता. आता शरद पवार मराठवाड्यात भाजपला आणखी एक धक्का देणार असल्याचे दिसत आहे.
या दिवशी करणार प्रवेश..
भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव हे ११ जुलै रोजी मुंबईत शरद पवार, जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांच्या काही समर्थकांसह पक्षात प्रवेश करणार आहेत.
उदगीर विधानसभा मतदारसंघात राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे सुधाकर भालेराव हे निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.