Politics News : शरद पवार यांच्या सांगण्यावरून मला…!! बड्या नेत्याच्या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ


Politics News : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सांगण्यावरून मला अटक करण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे. अनिल देशमुख जे आरोप करत आहेत ते बिनबुडाचे आणि खोटे असल्याचे ते म्हणाले.

अनिल देशमुख स्वतःला वाचवण्यासाठी हे सर्व आरोप करत आहेत. भाजपला नेस्तनाबूत व्हावे यासाठी खोटे गुन्हे दाखल करून अटक करण्याचे षडयंत्र रचण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

गिरीश महाजन म्हणाल, मला खोट्या प्रकरणात अडकवून अटक कशी करायची यावर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्या घरी सिल्व्हर ओक येथे बैठक झाली असल्याचे त्यांनी सांगितले. एकनाथ खडसेंच्या सांगण्यावरून शरद पवारांनी मला गोवण्याचा प्रयत्न केल्याचे गिरीश महाजन म्हणाले. Politics News

शरद पवारांचा माझ्यावर दबाव असल्याचे खुद्द अनिल देशमुख यांनी मला सांगितले. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा कट. माझ्या गाडीत ड्रग्ज टाकून मला अडकवण्याचा प्रयत्न केला. असे आरोप महाजन यांनी केले आहेत.

पुढे ते म्हणाले की, परमवीर सिंग आज जे आरोप करत आहेत. ते अगदी बरोबर आहे. मला आणि देवेंद्र फडणवीस यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये गोवण्याचा कट होता. अनिल देशमुख म्हणाले की, माझ्यावर शरद पवारांचा दबाव आहे.

एकनाथ खडसे जाऊन पवारांसमोर बसतात आणि मला खडसावले जाते. माझे म्हणणे खोटे वाटत असेल तर अनिल देशमुखांना माझ्यासमोर उभे करा, असे गिरीश महाजन म्हणाले. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!