Politics News : मोठी बातमी! भाजपचे १५ आमदार तडकाफडकी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई…


Politics News : हिमाचल प्रदेशच्या राजकारणातून एक मोठी बातमी आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्षांनी भाजपच्या तब्बल १५ आमदारांना निलंबित केले आहे. सभागृहाच्या कामकाजादरम्यान गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याचा आरोपाखाली विधानसभा अध्यक्षांनी ही कारवाई केली आहे.

विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर, विपिन सिंग परमार, रणधीर शर्मा, लोकेंद्र कुमार, विनोद कुमार, हंस राज, जनक राज, बलबीर वर्मा, त्रिलोक जामवाल, सुरेंद्र शोरी, दीप राज, पूरण ठाकूर, इंदर सिंग गांधी, दिलीप यांचा समावेश आहे. ठाकूर आणि इंदर सिंग गांधी यांची विधानसभेच्या अध्यक्षांनी आज सभापतींच्या दालनात घोषणाबाजी आणि गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून हकालपट्टी केली आहे.

हिमाचल प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी बुधवारी विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) १५ आमदारांना निलंबित केले आणि त्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब केले. सभागृहात गैरवर्तन आणि घोषणाबाजी केल्याच्या आरोपावरून भाजप आमदारांना निलंबित करण्यात आले. Politics News

सभागृहातून निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला बुधवारपासून (ता. २८) शिमला येथे सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष कुलदीप पठानिया यांनी विधानसभेचं कामकाज तातडीने स्थगित करत भाजप आमदारांना शांत राहण्याचं आवाहन केलं. मात्र, तरी देखील आमदारांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी सुरूच ठेवली. त्यामुळे सभापतींनी मार्शलला बोलावून आमदारांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!