Politics : जिरेगाव येथील सरपंच व शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश..
Politics यवत : दौंड तालुक्यातील अनेक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आरोग्यदूत आमदार राहुल (Rahul Kul) सुभाष कुल यांच्या कामावर प्रेरित होऊन भारतीय जनता पार्टी मध्ये आज शुक्रवार (ता.२२) प्रवेश केला आहे.( Politics)
जिरेगाव ( ता. दौंड) येथील सरपंच भरत खोमणे, उपसरपंच सुनंदा भंडलकर, बाळकृष्ण लाळगे, तंटामुक्ती समितीचे बापूराव लोणकर, कृष्णा भंडलकर, युवराज खोमणे, माजी उपसरपंच त्रिंबक भंडलकर, माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश भंडलकर, महेंद्र खंडाळे यांच्यासह सुमारे २०० कार्यकर्त्यांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे.
यावेळी आमदार राहुल कुल यांनी भाजपामध्ये दाखल झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. गावाच्या विकासासाठी शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार राहुल कुल यांनी दिले आहे.
दरम्यान, यावेळी पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, भीमा पाटसचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर,भाजपचे तालुकाध्यक्ष हरीश्चंद्र ठोंबरे, भीमा पाटसचे माजी संचालक लक्ष्मण रांधवन, संपत आटोळे,अरुण आटोळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.