Politics : ‘राष्ट्रवादी’च्या हवेलीतील दोन्ही ढगरींवरील कार्यकर्त्यांची होणार पंचायत! उलटी करणी आता भोवणार..!!


जयदीप जाधव

Politics उरुळीकांचन : राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या तत्कालीन निर्णयावर केलेले थेट भाष्य, शिरुर चे खासदार अमोल कोल्हे यांना राजकीय भूमिकेवरुन त्यांचा थेट पराभव घडून आणण्याची केलेली गर्जना व राष्ट्रवादी च्याच कार्यकर्त्यांना ‘एक तर माझ्या सोबत नाहीतर तिकडे’ राहण्याचा दिलेला अंतिम आदेश या सर्व अजित पवार यांच्या आक्रमक पवित्र्याने ढगरीवर असलेल्या राष्ट्रवादी च्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना दादांनी सूचक इशारा देऊन टाकला आहे. Politics

या सर्व परिस्थितीमुळे आता हवेली तालुक्यातील राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांची पुरती पंचायत झाली असून सत्तेत राहून अजित पवार यांच्याकडून कामे करुन घ्यायची आणि स्थानिक ठिकाणी लोकप्रतिनिधींशी मिलीभगत करायची हे राजकीय सूत्रे करणाऱ्या हवेलीकरांना आता एकाच ढगरीवर राहण्याची परिस्थिती उद्भवणार आहे.

राज्यात चार महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचा अजित पवार गट हा सत्तेत सामील झाल्यानंतर सत्ता मिळाल्याचा बेहोशीने पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते अजित पवार यांच्याकडून सत्तेतून कामे पूर्ण करण्यासाठी गर्दी करु लागले आहेत. या महत्वाचा व्यक्तींत वैयक्तिक कामे ,ठेकेदारी तसेच प्रशासनावर पकड मिळविण्यास काहींनी सुरुवात केली आहे. अजित पवार असतील त्यावेळी त्यांच्याकडे मात्र स्थानिक ठिकाणी त्यांच्या भूमिकेला विरोध असणाऱ्या मंडळींत ही मंडळी सर्वबाजूंनी आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करीत होती.

हवेली तालुक्यात शहरी व ग्रामीण भागातील काही मंडळी अगदी नेटाने परस्पर संबंध जपत होती. आता मात्र या ढगरीवरील पदाधिकाऱ्यांना अजित पवार यांच्या भूमिकेमुळे मोठी पंचायत होणार आहे. अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना थेट बारामती मध्येच ‘कुठं जायचं ते ठरवा ‘ असा सल्ला दिल्याने दोन्ही ढगरीवरील हात ठेवून असणाऱ्या हवेली तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आता एकच भूमिका निभवावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. Politics

हवेलीत ‘सकाळी इकडे रात्री तिकडे’ अशी काही मंडळींची राजकीय पध्दत आहे. अजित पवार सत्तेत गेल्याने त्यांच्याकडून कामे करुन घेता येतील व इकडे स्थानिक खासदार व आमदार यांच्यासोबत दुसऱ्या गटाशी संधान साधून आपली पोळी भाजून घेण्याचा चालाखपणा आता उघडा पडणार आहे.

हवेली तालुक्यात एका पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याच्या बदलीत स्थानिक ठिकाणी अजित पवार यांची शिफारस घेऊन दुसऱ्या गटाशी सलगी असणाऱ्या पदाधिकाऱ्याने बदलीचे काम करुन काम करुन चर्चा आहे. पदाधिकारी सत्तेत इकडे खाईचे व गोडवे दुसरीकडे गायचे असा सर्रास प्रकार करीत असल्याने अजित पवार गटाचा सत्तेचा फायदा काय असा थेट सवाल उपस्थित होत होता.

आता मात्र अजित पवार यांनी दुसऱ्या गटाशी पंगा व स्थानिक लोकप्रतिनिधींना पराभव घडून आणण्याचे शिवधनुष्य पेलल्याने हवेलीतील दोन्ही ढगरींवर खेळ करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आतून व बाहेरून काम करण्यासाठी दहा वेळा विचार करावा लागणार आहे. तसेच राजकीय दैवत एकच ठेवावे लागणार आहे.

अजित पवार हे तालुक्यातील राजकीय भूमिकेचा खडाणखडा माहिती ठेवणारे नेते असल्याने हवेलीतील ढगरीवर भूमिका असणाऱ्या कार्यकर्त्यांची माहिती मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात हवेलीतील सर्वत्र हिंडून आपले राजकीय दुकान चालू ठेवणाऱ्या पदाधिकाऱ्यांना हा थेट इशारा लागू होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!