पुण्यात महायुतीत राजकीय राडा! आमदार विजय शिवतारे यांना जिल्हा नियोजन समितीमधून काढलं, अजितदादांच्या जवळच्या आमदारांची लागली वर्णी…


पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पुणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या एकमेव आमदाराला वगळले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे येणाऱ्या काळात वातावरण तापणार आहे.

यामध्ये पुरंदरचे विधानसभा शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांना आज होणाऱ्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून वगळलं असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे शिवतारे आणि अजित पवार हा वाद पुन्हा एकदा पुढे येण्याची शक्यता आहे.

यामध्ये आता शिवतारे यांना वगळून राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनिल शेळके आणि भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत स्थान देण्यात आले आहे. यामुळे आता यावर शिवतारे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवतारे यांना बैठकीसाठी डावलल्याने पुण्यात महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विजय शिवतारे हे पुणे जिल्ह्यातले एकमेव शिवसेना आमदार आहेत. त्यांनाच वगळण्यात आल्यानं आता चर्चेला उधाण आलं आहे. याबाबत अजून प्रतिक्रिया समोर आली नाही.

आधीच ते मंत्रिपद न मिळल्याने नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. तसेच पालकमंत्रिपदावरून वाद असताना नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातल्या कोणत्या आमदारांना मतदारसंघातील विकासासाठी किती निधी मिळणार हे सुद्धा ठरणार आहे.

सगळ्यांना समान निधी मिळत नसल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी आधीच नाराजी व्यक्त केली होती. पुढे अर्थसंकल्पीय अधिवेशनसुद्धा लवकरच होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा वार्षिक योजनेचे प्रारूप आराखडे तयार कऱण्याचे निर्देश नियोजन विभागाकडून देण्यात आले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!